• 20 of March 2018, at 7.33 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

मनोरा आमदार निवास पाडणार, अमेरिकेत गोठल्या मगरी, कमला मील प्रकरणी विशाल करियाला अटक, एअर होस्टेसकडे कोटींचे अमेरिकन चलन, गोव्यात कायदेशीर बीफ, युसूफ पठाणवर बंदी.....१० जानेवारी २०१८

मनोरा आमदार निवास पाडणार, अमेरिकेत गोठल्या मगरी, कमला मील प्रकरणी विशाल करियाला अटक, एअर होस्टेसकडे कोटींचे अमेरिकन चलन, गोव्यात कायदेशीर बीफ, युसूफ पठाणवर बंदी.....१० जानेवारी २०१८

* सोयाबीनला लातुरच्या बाजारात आज आला ३२३२ रुपयांचा भाव, हमी भावापेक्षाही अधिक!
* त्रास देणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍याला विष पाजा, तुम्ही पिऊ नका, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांचे आवाहन
* मल्लिका शेरावतला सोडावा लागणार पॅरिसमधला फ्लॅट, भाडे न भरल्यानं मालकानं खेचलं कोर्टात
* तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार
* सरकार बदलेल या गिरीश बापटांच्या वक्तव्याला भाजपातून जोरदार विरोध
* गिरीश बापट यांच्या विधानाचं खा. सुप्रिया सुळे यांनी केलं स्वागत
* नांदेड येथे ११ फेब्रुवारीला आंबेडकरवादी साहित्य संमेलन
* मराठा विद्यार्थ्यांसाठी क्रिमी लेअरची मर्यादा झाली आठ लाख
* तूर खरेदी घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्यासाठी लातूर जिल्ह्यात चौकशी समिती स्थापन
* कॉपीमुक्तीसाठी लातूर शिक्षण मंडळ साधणार अडीच हजार मुख्याध्यापकांशी संवाद
* लातूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठ्याची थकबाकी भरण्यासाठी २० जानेवारीची मुदत
* औसा येथील ग्रीन बेल्टची बनावट कागदपत्रे वापरुन विक्री झाल्याची तक्रार दाखल
* बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मालपाणी यांच्या निवासस्थानी आज आ. अमित देशमुख देणार भेट
* मुंबईतले मनोरा आमदार निवास पाडून नवे आमदार निवास बांधणार, एक फेब्रुवारीपासून पाडकाम
* कमला मील आग प्रकरणी विशाल करियाला अटक, कारही जप्त, करियाने दिला होता आरोपींना आश्रय
* कमला मिल आग प्रकरण: मोजोस ब्रिस्टोचा मालक युग टुलीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ जानेवारीला सुनावणी
* घटणारा विकास दर: पंतप्रधान घेणार देशातील प्रमुख अर्थतज्ञांसोबत घेणार बैठक
* कृषी, आरोग्य आणि रोजगारावर पंतप्रधान अर्थतज्ञांकडून घेणार माहिती
* अमेरिकेत थंडीमुळे अनेक जलसाठे गोठले, मगरीही गोठल्या
* भिमा कोरेगाव हिंसाचारात मरण पावलेल्या राहूल फटांगडे्च्या कुटुंबाला १० लाखांची मदत सुपूर्त
* भिमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी, दोन्ही गटातील व्यक्तींचा समावेश
* भिमा कोरेगाव दगडफेक कोणी केली सरकारला शोधता आले नाही, दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हा दाखल करून काय साध्य होणार?- पृथ्वीराज चव्हाण
* आगामी निवडणुकीसाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यात मुख्यमंत्री यशस्वी- पृथ्वीराज चव्हाण
* राज्यात थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार तसेच स्थैर्य देण्यासाठी कायद्यात आवश्यक ती सुधारणा करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
* थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्यांना कामकाजात येत होत्या मोठ्या अडचणी
* पुण्याच्या काळेवाडीत दुचाकीवरुन जाणार्‍या चिमुरड्या्च्या डोळ्याला पतंगाच्या मांजाने केली गंभीर जखम
* गोव्यात आजपासून कायदेशीररित्या बीफ विक्रीला होणार सुरुवात
* जेट एअरवेजच्या एअर होस्टेसकडे सापडले तब्बल तीन कोटींचे अमेरिकन चलन
* २८ आठवड्याच्या महिलेला उच्च न्यायालयाने दिली गर्भपाताची परवानगी, बाळ निरोगी जन्मण्याची शक्यता कमी
* यंदाच्या रबीत गहू आणि तेलबियांची लागवड झाली कमी, तांदळाची लागवड वाढली
* पोलिसांचा विरोध डावलत जिग्नेश मेवानी यांनी काढली ‘हुंकार रॅली’, एका हातात संविधान अन दुसर्‍या हातात मनुस्मृती
* पुण्यात बनावट नोटा तयार करणार्‍या दोघांना अटक, यातला एक आयटी इंजिनियर, मोठी पगार घेणारा
* शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यापूर्वी मनपाने दिली होती नोटीस
* जे साधायचं ते आताच साधून घ्या, वर्षभरात सरकार बदलणार आहे, मंत्री गिरीश बापटांचा कार्यकर्त्यांना सल्ला
* जीएसटीच्या आज होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांचे २३० कोटींचे प्रस्ताव येणार मंजुरीसाठी
* अमेरिकेसाठीच्या एच ०१ बी व्हिसा नियमांत कोणताही बदल न करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय, भारतीय तंत्रज्ञांना दिलासा
* ८० दिवसात ५० कोटी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचे दूरसंचार कंपन्यांसमोर आव्हान, ०३ टक्के ग्राहकांचीच आधार जोडणी
* अन्य देशांच्या भूभागावर आणि साधनसंपत्तीवर भारताचा डोळा नाही- नरेंद्र मोदी
* न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत निवासी डॉक्टरांनी पुन्हा संप केल्यास न्यायालय अवमानाची याचिका करा- उच्च न्यायालय
* विकासाच्या अनेक योजना आणल्या पण आम्ही कधीच मार्केटिंग केले नाही, याच्या अगदी उलट नरेंद्र मोदींचे सुरू- सुशीलकुमार शिंदे
* औरंगाबादचे महापौरपद रद्द करण्याची एमआयएमची विभागीय आयुक्तांकडे मागणी
* औरंगाबादमधील अतिक्रमण कारवाईस विरोध केल्याने एमआयएमच्या ०५ नगरसेवकांचे सदस्यत्त्व रद्द झाल्याने महापौर पदच रद्द करण्याची मागणी
* मुंबईतील वृद्ध दाम्पत्याची इच्छा मरणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र
* नाना पटोलेंच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या भंडारा-गोंदियाची पोटनिवडणूक लढण्याची प्रफुल्ल पटेलांना इच्छा नाही
* बेस्ट करणार पुन्हा जुन्या पद्धतीच्या कागदी तिकिटांचा वापर, ०१ कोटी ७१ लाख खर्च करण्याचा बेस्टचा प्रस्ताव, १५९ बसगाड्या सेवेतून बाद
* इंद्राणीने शीनाची हत्या करण्यापूर्वी रायगड जिल्ह्यात जंगलाची जागा शोधाताना आणि हत्या केल्यावर पीटर मुखर्जीला फोन केला- ड्रायव्हर श्यामवर
* नीट परीक्षा केंद्रावर पाच मिनिटे उशीर झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना देता आली नाही परिक्षा, याविरोधात दाद मागण्यासाठी विद्यार्थी दिल्लीत दाखल
* अरविंद केजरीवाल यांच्या सिंदखेडराजा येथील महाराष्ट्र संकल्प सभेला पोलिसांची परवानगी
* उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने क्रिकेटपटू युसूफ पठाणवर पाच महिन्यांची बंदी
* बचत गटांनी उत्‍पादित केलेल्या वस्‍तूंसाठी आता राज्‍य शासनाचा 'अस्मिता ब्रॅण्ड'- पंकजा मुंडे
* अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याजमाफी योजनेला प्रजासत्ताक दिनापासून होणार सुरुवात- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
* राज्यातील ०२ लाख ८८ हजार तरुण तरुणींना मिळणार मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण- चंद्रकांत पाटील
* गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने नाही तर ब्रह्मगुप्त द्वीतीय यांनी मांडला- राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी
* डोकलाममध्ये चिनी सैन्यात लक्षणीय कपात, बिपीन रावतांच्या वक्तव्यावर चीनचे मौन, चीनच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी तैनात- चीनचे उत्तर


Comments

Top