logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   काल, आज आणि उद्या

खासदारांची पाहणी, पुन्हा गारपिटीची शक्यता, रेडिओ डे, सोयाबीन टॉपवर, पकोडे पे चर्चा, आज पाचवी वन डे, संघाकडून अवमान......१२ फेब्रुवारी २०१८

खासदारांची पाहणी, पुन्हा गारपिटीची शक्यता, रेडिओ डे, सोयाबीन टॉपवर, पकोडे पे चर्चा, आज पाचवी वन डे, संघाकडून अवमान......१२ फेब्रुवारी २०१८

* येत्या ४८ तासात पुन्हा वादळी वारे आणि गारपीट होण्याचा अंदाज, सतर्क राहण्याचे आवाहन
* डीएसकेंना पुन्हा २२ तारखेपर्यंत जामीन, १२ कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सादर
* विदर्भात सलग तिसर्‍या दिवशी गारपीट
* धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनीचा मोबदला मिळणार ५४ लाख रुपये
* गारपिटीमुळं सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्यात
* मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधी उस्मानाबादेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
* राज्यातील ३४०० फळबागांचं नुकसान
* नगरमध्ये मिठाईचे पैसे मागणार्‍या दुकानदाराची वीज महावितरणच्या अधिकार्‍याने कापली
* कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली नुकसानीची पाहणी
* मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे दिवस आणखी धोक्याचे
* डीएसके यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
* अहमदपूरचे दत्ता गलाले, उदगीरचे रणजित चामले, देवणीच्या पवनराज पाटील यांना शिवछत्रपती पुरस्कार
* जळकोटच्या तहसीलदारांना आपच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
* नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्‍यात सरकारी पैशांचा दुरुपयोग, कॉंग्रेसचा पुराव्यांसह आरोप
* माझ्यावरील अन्यायाची चर्चा थांबवा, खुद्द छगन भुजबळ यांनीच केले आवाहन
* लातुरचे महापौर सुरेश पवार आणि उप महापौर देवीदास काळे यांनी केली सिद्धेश्वर यात्रा देवस्थानची पाहणी
* लातूर बाजारात सोयाबीनने गाठला चार हजारांचा टप्पा, या हंगामातला सर्वाधिक भाव
* लातुरच्या कचरा डेपोला नांद्गावकरांनी घातले कुलूप, शेती व घरे कचरामय होत असल्याचा दावा
* खा. सुनील गायकवाड यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी
* सरसंघचालकांनी केलेलं विधान सैनिकांसाठी अवमानकरक- अशोक चव्हाण
* देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, बहुतांश शिवमंदिरात दुग्धाभिषेकाचा सोहळा
* सलग दुसर्‍या दिवशीही मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा तडाखा
* शाळातल्या ग्रंथालयांसाठी मोदींच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी
* आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालय आवारात नायलॉन जाळ्या, मंत्रालय आहे की सर्कशीचा फड?- धनंजय मुंडे, पंधरवड्यात तीन आत्महत्येचा प्रयत्न
* राहूल गांधींनी कर्नाटक प्रचारात केली ‘पकोडा पे चर्चा’
* ओमान दौर्‍यात मस्कतमध्ये शिवमंदिरात पंतप्रधानांनी केला अभिषेक
* युध्द हा मार्ग नाही, चर्चेतून तोडगा काढता येईल- काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती
* दक्षिण अफ्रिकेसोबत आज भारताची पाचवी वन डे क्रिकेट स्पर्धा
* मुंबईत पक्षांची संख्या घटू लागली, केवळ २३६ प्रजातीचे पक्षी आढळतात
* विरोधक, व्यापार्‍यांकडून जीएसटी कराला विरोध, कर सुसंगत नाही, हायकोर्टाची तक्रार
* जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने काढला सर्वात स्वस्त मोबाईल प्लान
* राजस्थानात शेतकर्‍यांना सरसकट ५० हजार रुपये कर्जाची माफी
* जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारच्या विरोधात आंदोलने करा, उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना आवाहन
* सरकारने आधी कारभारावर लागलेली जाळी-जळमटी काढावी- राधाकृष्ण विखे पाटील
* परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात पावसामुळे गोठा अंगावर पडून महिलेचा मृत्यू
* गारपिटीची नुकसान भरपाई मिळत नसेल तर आंदोलन करा- उद्धव ठाकरेंचे सेनेच्या तालुकाप्रमुखांना आदेश
* सरकारवर काही संकट आले, की त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जाते, मी संकटमोचक - चंद्रकांत पाटील
* मुंबईत वाहतुकीसाठी सुरु होणार रोप-वे, जलमार्ग, आणि रो-रो सेवा
* पहिल्या टप्प्यात शिवडी ते एलिफंटादरम्यान रोप-वे, ०१ एप्रिपासून भाऊचा धक्का ते मांडवा-नेरुळ रो-रो सेवा- नितीन गडकरी
* आज साजरा होत आहे वर्ल्ड रेडिओ डे
* मुंबईत बेस्ट कर्मचार्‍यांचा १५ फेब्रुवारी रोजी संप
* छत्रपती पुरस्कारांचे १७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते वितरण, १९५ जणांना पुरस्कार जाहीर
* प्रा. यशवंत मनोहर आणि दासू वैद्य यांना मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर
* अधिकाऱ्यांनी माध्यमांना परस्पर बातम्या देऊ नयेत- नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे, देवी-देवतांचे सर्व फोटो काढावे
* सुंजवान हल्ल्याला पाक जबाबदार, याची किंमत पाकला चुकवावी लागेल- संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन
* सुंजवान हल्ल्यानंतर भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची पाकला भीती, भारताने तसे केल्यास प्रत्युत्तर देऊ- पाकचा इशारा
* नागालँडमध्ये भाजपला मत न देण्याचे चर्चचे आवाहन, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभेच्या फेब्रुवारी अखेर निवडणुका
* मोहन भागवतांनी देश आणि शहिदांचा अपमान केला, त्याबद्दल भागवत यांना लाज वाटली पाहिजे- राहुल गांधी
* निवडणूक न लढविण्याचा उमा भारतींचा निर्णय
* भागवत लष्कराची तुलना संघाशी करत नव्हते, संघाने स्वयंसेवकांना ट्रेनिंग दिले तर तीन दिवसात सीमेवर लढायला तयार होतील- संघाचे पत्रक
* मोहन भागवत यांची खाजगी सेना उभारणी सरकारला मान्य आहे का?- नरेंद्र मोदी यांनी भूमिका जाहीर करावी- कॉंग्रेस
* सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटला: आणखी दोन साक्षीदार ‘फितूर’, गप्प असलेल्या सीबीआयच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
* सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक सीबीआयकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबाबत न्यायालय नाराज
* सीबीआयची हीच भूमिका असेल तर खटला चालवलाच का जात आहे? - न्यायालयाचा प्रश्न
* देशातील वनक्षेत्र दोन वर्षांत वाढले ०८ हजार ०२१ चौरस किलोमीटरने


Comments

Top